Bible Versions
Bible Books

Song of Solomon 8 (MRV) Marathi Old BSI Version

1 माझ्या आईचे दुध पिणाऱ्या माझ्या लहानग्या भावासारखा तू असावास असे मला वाटते. तू जर मला बाहेर दिसलास तर मी तुझे चुंबन घेईन आणि त्यात काही गैर आहे असे कुणीही म्हणणार नाही.
2 2 मी तुला माझ्या आईच्या घरात घेऊन जाईन. जिने मला शिकवले तिच्या खोलीत मी तुला नेईन. मी तुला माझ्या डाळींबांपासून बनवलेले मसाल्यांनी युक्त असे मद्य देईन.
3 3 त्याचा डावा बाहू माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा बाहू मला धरत आहे.
4 4 यरुशलेमच्या स्त्रियांनो, मला वचन द्या. माझी तयारी होईपर्यंत प्रेमाला जागवू नका, चेतवू नका.
5 5 वाळवंटातून, प्रियकराच्या अंगावर रेलत येणारी ही स्त्री कोण आहे?मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, जिथे तुझ्या आईने तुला प्रसवले, जिथे तुझा जन्म झाला तेथे.
6 6 तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस, किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्‌का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे. त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात आणि त्याची खूप मोठी आग होते.
7 7 प्रेमाला पूर नष्ट करु शकत नाही, नद्या प्रेमाला बुडवू शकत नाहीत. जर एखाद्याने आपल्या जवळचे सर्वकाही प्रेमासाठी उधळून दिले तर त्याला बोल लावला जाईल. त्याचा तिरस्कार होईल.
8 8 आम्हाला एक लहान बहीण आहे आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. जर एखादा माणूस मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगत आला तर आम्ही काय करायचे?
9 9 ती जर भिंत असती तर आम्ही तिच्याभोवती चांदीची महिरप उभारली असती. ती जर दार असती तर तिच्या भोवती आम्ही देवदारुची फळी ठेवली असती.
10 10 मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे माझे मनोरे आहेत. आणि तो माझ्या बाबतीत पूर्ण समाधानी आहे.
11 11 शलमोनचा बाल हामोनला एक द्राक्षाचा मळा होता. त्याने माणसांना मळ्याचे प्रमुख नेमले आणि प्रत्येकाने 1000 शेकेल चांदीच्या मूल्याइतकी द्राक्षे आणली.
12 12 शलमोना, तू तुझे 1000 शेकेलठेवून प्रत्येकाला त्याने आणलेल्या द्राक्षाच्या मोबदल्यात 200 शेकेल दे. पण मी माझा स्वत:चा द्राक्षाचा मळा मात्र ठेवणार आहे.
13 13 तू इथे या बागेत बस. मित्र-मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!
14 14 माझ्या प्रियकरा, तू लवकर चल. मसाल्याच्या पर्वतावरील हरिणासारखा वा तरुण हरिणासारखा हो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×