Bible Versions
Bible Books

Numbers 18 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर अहरोनला म्हणाला, “या पवित्र जागेविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या तर तू, तुझी मुले, तुझ्या वडिलांच्या कुटुंबातले सगळे लोक त्याला जबाबदार रहाल. तू आणि तुझी मुले याजकांविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल जबाबदार राहाल.
2 2 तुझ्या कुळातील इतर लेवी लोकांना आण. तुझ्याबरोबर आणि कराराच्या मंडपात काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.
3 3 लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
4 4 ते तुझ्या बरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शन मंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशिल तेथे दुसरा कोणीही येऊ नये.
5 5 “पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही.
6 6 इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शन मंडपात काम करतील.
7 7 पण अहरोन फकत तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फकत तुम्हीच जाऊ शकता. अति पवित्र स्थानाच्या पडद्याआड फकत तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे - याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्याला मारुन टाकले जाईल.”
8 8 नंतर परमेश्वर अहरोनला म्हणाला, “लोक मला ज्या खास भेटी देतात त्यांची जबाबदारी मी स्वत: तुझ्यावर टाकली आहे. इस्राएलाचे लोक ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. त्या नेहमीच तुमच्या राहतील.
9 9 लोक होमार्पण, धान्यार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला ने जळलेला भाग तुझा असेल. त्या सगव्व्या गोष्टी फकत तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
10 10 त्या गोष्टी फकत पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
11 11 “आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. हा तुझा वाटा आहे. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक शुद्ध माणूस ती खाऊ शकेल.
12 12 “आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
13 13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
14 14 “इस्राएलमधून ज्या ज्या गोष्टी परमेश्वराला देण्यातयेतात त्या तुझ्या आहेत.
15 15 “स्त्रिचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
16 16 मूल एक महिन्याचे झ्याल्यानंतर त्यांनी पैसे दिले पाहिजेत. त्याची किंमत दोन औंसचांदी इतकी असेल. तू चांदी मोजायला अधिकृत मोजमापच वापरले पाहिजेस. अधिकृत मोजमापानुसार एक शेकेल म्हणजे 20 गेरा.
17 17 “परंतु तू प्रथम जन्मलेल्या गाय, मेंढी आणि बकरीसाठी पैसे देऊ नकोस. ते प्राणी पवित्र आहेत. त्यांचे रकत वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला संतोष देतो.
18 18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.
19 19 लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला पवित्र करार आहे. तो मोडतायेणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
20 20 परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, “तुला कुठलीही जमीन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांना मी वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळेल. पण मी मात्र तुझी भेट आहे.
21 21 “इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टीतला दहावा हिस्सा देतील. म्हणून तो दहाव्वा भाग मी लेवीच्या सर्व वंशजांना देतो. ते दर्शन मंडपात जे काम करतील त्याचा हा मोबदला आहे.
22 22 परंतु इस्राएलच्या इतर लोकांनी कधीनी दर्शन मंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले तर त्यांना मारून टाकण्यात यावे.
23 23 लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही.
24 24 परंतु इस्राएल लोकांजलऴ जे आहे त्याच्या दहावा भाग ते मला देतील. आणि तो दहावा भाग मी लेवी लोकांना देईन. म्हणून मी लेवी लोकांबद्दल असे बोललो: त्या लोकांना मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती मिळणार नाही.”
25 25 परमेश्वर मोशेला म्हणाला,
26 26 “तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळ जे जे आहे त्या सगव्व्याचा दहावा भाग परमेश्वराला देतील. तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
27 27 पिक काढल्यानंतर तुला धान्य देण्यात येईल आणि द्राक्षारसही देण्यात येईल. म्हणून ती तुझी परमेश्वराला देण्यात येणारी अर्पणे असतील.
28 28 याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वराला अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वराला जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.
29 29 इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
30 30 “मोशे लेवी लोकांना सांग: इस्राएलचे लोक त्यांच्या कापणीचा आणि द्राक्षारसाचा दहावा भाग त्यांना देतील. तेव्हा तुम्ही त्यातला सर्वात चांगला भाग परमेश्वराला द्यावा.
31 31 उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांनी खावा. तुम्ही दर्शन मंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
32 32 आणि जर तुम्ही सर्वांत चांगला दहावा भाग परमेश्वराला द्याल तर तुम्ही कधीही अपराधी होणार नाही. तुम्हाला हे नेहमी आठवेल की त्या भेटी म्हणजे इस्राएल लोकांकडून पवित्र अर्पणे होत आणि तुम्ही मरणार नाही.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×