Bible Versions
Bible Books

Romans 16 (MRV) Marathi Old BSI Version

1 किंख्रिया येथील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो
2 2 की, संतांना योग्या अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.
3 3 ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा.
4 4 ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळयाही आभार मानतात.
5 5 त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा.माझा प्रिय मित्र अपैनत जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे यालाही सलाम सांगा.
6 6 मरीया जिने तुमच्यासाठी फार काम केले तिला सलाम सांगा.
7 7 अंद्रोनीक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान जे प्रेषितांमध्ये नामांकित आहेत ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते त्यांना सलाम सांगा.
8 8 प्रभुमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा.
9 9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सलाम सांगा.
10 10 ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबूल याच्या घरातील मंडळीस सलाम सांगा.
11 11 माझा नातेवाईक हेरोदियोन आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे. त्यांना सलाम सांगा.
12 12 त्रुफैना आणि त्रफीसा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत त्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत तिला सलाम सांगा.
13 13 प्रभूमध्ये निवडलेला रुफ आणि त्याची आई जी माझीही आई आहे तिला सलाम सांगा.
14 14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्याबरोबर जे बंधु आहेत त्यांना सलाम सांगा.
15 15 फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुंपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा.
16 16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
17 17 बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्यापासून दूर राहा.
18 18 असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वत:च्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता.
19 19 त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वास णाऱ्यांना तुंम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.
20 20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.
21 21 माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
22 22 पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभुमध्ये सलाम सांगतो.
23 23 माझे सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात.
24 24 (आपला प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.)
25 25 आता देव जो तुमच्या विश्वासात, तुम्हांला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभु येशू ख्रिस्तविषयी विदित करण्यास तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला देवाच्या रहस्याच्या प्रकटीकरणाला, धरुन जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होत ते प्रकट करणाऱ्या देवाला गौरव असो.
26 26 परंतु आता आपणांला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की, हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करुन दिले आहे.
27 27 एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×