Bible Versions
Bible Books

Amos 5 (MRV) Marathi Old BSI Version

1 इस्राएलच्या लोकांनो, हे गीत ऐका हे विलापगीत तुमच्याबद्दल आहे.
2 2 इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.
3 3 परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: “हजार माणसांना घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त दहा माणसांना घेऊन परततील.
4 4 परमेश्वर इस्राएल राष्ट्राला असे सांगतो, “मला शरण या आणि जगा.
5 5 पण बेथेलास शरण जाऊ नका; गिल्गालला जाऊ नका; सीमा ओलांडून खाली बैरशेब्यालाही जाऊ नका. गिल्गालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल. आणि बेथेलचा नाश केला जाईल.
6 6 परमेश्वराकडे जा आणि जगा. तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल. ती आग योसेफचे घर भस्मसात करील. बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
7 7 तुम्ही मदतीसाठी परमेश्वराची याचना करावी. देवानेच कृत्तिका मृगशीर्ष यांची निर्मिती केली. तो परमेश्वरच अंधाराचे रूपांतर सकाळच्या उजेडात करतो. तोच दिवसाचे परिवर्तन अंधाव्या रात्रीत करतो. समुद्रातील पाण्याला बोलावून जमिनीवर ओततो त्याचे नाव ‘याव्हे!’ तो एक मजबूत शहर सुरक्षित ठेवतो. तर दुसऱ्या भक्कम शहराचा नाश होऊ देतो.”तुम्ही चांगुलपणा विषात बदलता तुम्ही न्यायाला मारून धुळीत पडू देता.
8 8
9 9
10 10 संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
11 11 तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
12 12 का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
13 13 त्या वेळी, सुज्ञ शिक्षक गप्प बसतील. का? कारण ती वाईट वेळ आहे.
14 14 परमेश्वर तुमच्याबरोबर’ आहे असे तुम्ही म्हणता, मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे. त्यामुळे तुम्ही जगाल सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
15 15 दुष्टाव्याचा तिरस्कार करा चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपाकरील.
16 16 माझा प्रभू सर्वशक्तिमान देव म्हणतो, “लोक चव्हाट्यावर रडत असतील रस्त्यांतून ते रडतील. धंदेवाईक रडणाऱ्यांना लोकभाड्याने बोलवून घेतील.
17 17 द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील. का? कारण मी तुमच्यामध्ये फिरून तुम्हाला शिक्षा करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
18 18 परमेश्वरचा खास न्यायाचा दिवस पाहण्याची तुमच्यापैकी कीहींची इच्छा आहे. तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे? परमेश्वराचा तो खास दिवस अंधार आणणार आहे, उजेड नाही.
19 19 सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा, अशी तुमची स्थिती होईल. घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा, तशी तुमची अवस्था होईल.
20 20 परमेश्वराचा खास दिवस अंधारच आणील, उजेड नाहीतो निराशेचा दिवस असेल, प्रकाशाचा एक किरणही नसेल तो आनंदचा दिवस नसेल.
21 21 “मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक-सभा मला आवडत नाहीत.
22 22 तुम्ही मला होमार्पणे अन्नार्पणे जरी दिलीत, तरी मी ती स्वीकारणार नाही. शांत्यार्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
23 23 तुमची कर्कश गाणी येथून दूर न्या. तुमचे वाद्यसंगीत मी ऐकणार नाही.
24 24 तुम्ही, तुमच्या देशातून, पाण्याप्रमाणे, न्यायीपणा वाहू द्यावा. कधीही कोरडा पडणाऱ्या झऱ्याप्रमाणे चांगुलपणा वाहावा.
25 25 इस्राएल, वाळवंटात, 40 वर्षे तू मला यज्ञ दाने अर्पण केलीस.
26 26 पण तुम्ही सक्कूथ ह्या तुमच्या राजाची कैवानची मूर्तीसुध्दा वाहून नेली. तुम्ही स्वत:च तुमच्या दैवतांसाठी तारा तयार केला.
27 27 म्हणून मी तुम्हाला कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. त्याचे नाव सर्वशक्तिमान देव!
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×