Bible Versions
Bible Books

Psalms 139 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 6 तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7 7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8 8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9 9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11 11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
13 13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे.
18 18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.
19 19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
20 20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात. ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
21 21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
22 22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो. तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
23 23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×