Bible Versions
Bible Books

2 Chronicles 3 (MRV) Marathi Old BSI Version

1 यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते. दावीदाने तयार करुन ठेवलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे.
2 2 आपल्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
3 3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया 60 हात लांब आणि 20 हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.
4 4 मंदिराच्या समोरचा द्वारमंडप 20 हात लांब आणि वीस हात उंच होता. त्याची आतील बाजू शलमोनाने शुध्द सोन्याने मढवली होती.
5 5 मोठ्या खोलीला सर्वबाजूंनी त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यांवर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे साखळ्या कोरुन काढल्या
6 6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौदर्यात भर घातली. यात वापरलेले सोने पर्वाइमचे होते.
7 7 तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने शोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.
8 8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्र स्थान 20 हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर 23टन सोने होते.
9 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
10 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
11 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.
12 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता.
13 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करुन उभे होते.
14 14 निळ्या, जांभळ्या आणि उंची किरमिजी वस्त्राचा पडदा करुन घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
15 15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभले केले. हे स्तंभ 35हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते.
16 16 शलमोनाने साखळ्या करुन त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने 100 शोभिवंत डाळिंबे कलाकुसर म्हणून लावली.
17 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×