Bible Versions
Bible Books

2 Corinthians 9 (MRV) Marathi Old BSI Version

1 या संताच्या सेवेसाठी मी तुम्हांला काही लिहावे याची गरज भासत नाही.
2 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
3 3 परंतु मी भावांना यासाठी पाठवीत आहे की, आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरु नये. पण जसे आम्ही तुम्हांला सांगितले तसे तुम्ही तयार असावे.
4 4 कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला, आणि जर त्याने तुम्हांला तयार नसलेले पाहिले, तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही. तर आम्ही लज्जित होऊ.
5 5 म्हणून मला हे आवश्यक आहे की, बंधूनी आम्हांला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विंनति करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे, तिच्याविषयीची व्यावस्था संपवावी. मग ती उदारहस्ते दिलेली देणगी ठरेल कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही.
6 6 हे लक्षात ठेवा: जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील.
7 7 प्रत्येक माणसाने अंत:करणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो.
8 8 आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी, तुम्हांला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामसाठी अधिक तत्पर व्हाल.
9 9 असे लिहिले आहे:“तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याची दया अनंतकाळपर्यंत राहील.”स्तोत्र. 112: 9
10 10 जो पेरणाऱ्याला बी खाणऱ्याला अन्न पुरवितो, तो तुम्हाला पेरायला बी पुरवील आणि ते अनेकपट करील. आणि तुमच्या नीतिमत्वाची फळे वाढवील.
11 11 सर्व प्रकारच्या उदारपणाकरिता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल. यामुळे तुम्हीदेखील उदारपणे द्यावे ज्यामुळे देवाची स्तुति होईल.
12 12 कारण या अर्पणकार्याची ही सेवा संताच्या गरजा पुरविते. इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते.
13 13 कारण या सेवेमुळे तुम्ही स्वत:ला योग्य शाबित करता, आणि ते देवाचे गौरव करतात, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे.
14 14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे, त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात.
15 15 देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×