Bible Versions
Bible Books

Hosea 8 (MRV) Marathi Old BSI Version

1 “रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत
2 ‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात.
3 पण इस्राएलने चांगल्या गोष्टी नाकारल्या म्हणून शत्रू त्याचा पाठलाग करतात.
4 इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वत:साठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल.
5 शोमरोन, तुझे वासरू परमेश्वराने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, ‘मी इस्राएल लोकांवर रागावलो आहे.” इस्राएलच्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा केली जाईल काही कामगारांनी ते पुतळे घडविले ते काही परमेश्वर नाहीत. शोमरोनच्या वासराचे तुकडे तुकडे केले जातील
6
7 इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.
8 कोणालाही नको असलेल्या ताटासारखा इस्राएल असल्यामुळे त्याचा नाश केला गेला. इस्राएलला दूर फेकण्यात आले. म्हणून इस्राएल लोक इतर राष्ट्रांत विखुरले गेले.
9 एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला. रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
10 इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले. पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन. पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.
11 एफ्राईमने पुष्कळ वेद्या बांधून पापच केले. त्या वेद्या एफ्राईमच्या पापाच्या वेद्या बनल्या आहेत.
12 मी एफ्राईमसाठी जरी 10 ,000 नियम लिहिले, पण एफ्राईमने ते परक्यासाठी असल्याप्रमाणे मानले.
13 इस्राएलींना बळी देणे आवडते. ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात. परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही. त्याला त्यांची पापे स्मरतात. म्हणून तो त्यांना शिक्षा करील. कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
14 इस्राएलने राजवाडे बांधले. पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे. पण मी यहूदातील गावाला आग लावीन आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×