Bible Versions
Bible Books

Galatians 1 (MRV) Marathi Old BSI Version

1 प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते.देव जो पिता त्याने येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले.
2 2 हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडूनही आहे. आणि हे गलतीयायेथील मंडळ्यांना(विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.
3 3 यांची कृपा चांगुलपण शांति तुम्हाबरोबर असो.
4 4 येशूने स्वत:ला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्हीराहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती.
5 5 त्याला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
6 6 मला आश्चर्य वाटते की ज्या देवाने तुम्हांला ख्रिस्ताद्धारे बोलाविले आहे त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर दुसन्यासुवार्तेकडे वळत आहात.
7 7 ती खरी सुवार्ता नाही पण असे काही जण आहेत की ते तुम्हांला गोंधळात टाकीत आहेत वख्रिस्ताविषयीची सुवार्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
8 8 आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवास्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो.
9 9 आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आतापुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हांस सांगत असेल तर देव त्याला शाप देवो.
10 10 आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करीत आहे काय? मी मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो.
11 11 बंधूनो, तुम्हांला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तो मानवी संदेश नाही.
12 12 कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली.
13 13 यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळकेला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला.
14 14 माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्यालोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.
15 15 त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवाकरण्यासाठी त्याने मला बोलावले.
16 16 आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की, विदेशीलोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही.
17 17 किंवा जे माझ्यापूर्वीप्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.
18 18 मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो.
19 19 परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल.
20 20 आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे, ते खोटे नाही.
21 21 नंतर मी सूरीया किलीकिया प्रांतांत गेलो.
22 22 परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो.
23 23 त्यांनी फक्त ऐकलेहोते. लोक म्हणतात: “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला, ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचाप्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.”
24 24 आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×