Bible Versions
Bible Books

Numbers 1 (MRV) Marathi Old BSI Version

1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,
2 2 “सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.
3 3 वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
4 4 प्रत्येक वंशातला एकजण तुम्हाला मदत करील तो त्या वंशाचा प्रमुख असेल.
5 5 तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही:रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
6 6 शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;
7 7 यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
8 8 इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;
9 9 जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
10 10 योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.
11 11 बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान;
12 12 दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;
13 13 आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;
14 14 गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
15 15 नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;”
16 16 1हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले.
17 17 प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले;
18 18 आणि त्यांनी सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमविले; मग त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.
19 19 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
20 20 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र-थोरला मुलगा-रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्यांच्याप्रमाणे करण्यात आली.
21 21 ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
22 22 शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
23 23 ती मोजदाद एकूण एकुणसाठ हजार तीनशे भरली.
24 24 गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
25 25 ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली.
26 26 यहुदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
27 27 ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.
28 28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
29 29 ती मोजदाद एकूण चोपन्न हजार चारशे भरली.
30 30 जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
31 31 ती मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.
32 32 योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
33 33 3ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली.
34 34 मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
35 35 ती मोजदाद एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.
36 36 बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
37 37 ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली.
38 38 दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
39 39 ती मोजदाद एकूण बासष्ट हजार सातशे भरली.
40 40 आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
41 41 ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.
42 42 नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
43 43 ती मोजदाद एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.
44 44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली.
45 45 त्यांनी वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
46 46 ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
47 47 इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही.
48 48 परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,
49 49 “लेवी कुळांच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करुं नको;
50 50 लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी.
51 51 जेव्हा जेव्हा पवित्र निवास मंडप हलवावयाचा असेल तेव्हा तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; लेवी कुळापैकी नसलेला कोणी जर पवित्रनिवास मंडपाच्या सेवेचा प्रयत्न करु लागलां तर त्याला जिवे मारावे.
52 52 इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ ठोकावेत.
53 53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”
54 54 परमेशवराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×