Bible Versions
Bible Books

1 Corinthians 10 (MRV) Marathi Old BSI Version

1 बंधूनो, तुम्हांला हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
2 मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांचा मेघात समुद्रात बाप्तिस्मा झाला.
3 त्यांनी एकच आध्यात्मिक अन्र खाल्ले. ते एकच आध्यात्मिक पेय प्याले. कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते. आणि तो खडक ख्रिस्त होता.
4
5 परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता, आणि त्यांना अरण्यात ठार मारण्यात आले.
6 आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
7 त्यांच्यापैकी काही जण होते तसे मूर्तिपूजक होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते नाचणे, मौजमजा करण्यासाठी उठले.”
8 ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केले तसे जारकर्म आपण करु नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
9 आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले.
10 कुरकूर करु नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाल की, मृत्युदूताकडून ते मारले गेले.
11 या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या. त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात
12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
13 जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.
14 तेव्हा, माइया प्रियांनो, मूर्तिपूजा टाळा.
15 मी तुमच्याशी बुद्धिमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.
16 “आशीर्वादाचा प्याला” जो आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्तात सहभागी आहे, नाही का?
17 वस्तुस्थिती अशी आहे की फक्त भाकरीचा एकच तुकडा आहे म्हणजे आपण सर्व एकाच शरीरापासून आहोत, आपण पुष्कळजण एक भाकर, एक शरीर आहोत. कारण आपला सर्वांचा त्या भाकरीत भाग आहे.
18 इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत. नाही का?
19 तर मी काय म्हणतो? माइया म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तिला वाहिलेले अन्र काहीतरी आहे किंवा ती मूर्ति काहीतरी आहे?
20 नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण ते लोक करतात ते अर्पण भुतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही!
21 तुम्ही देवाचा आणि भुताचासुद्धा असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.
22 आपण प्रभूला ईर्षेस पेटाविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही.
23 “काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांना सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
24 कोणीही स्वत:चेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
25 मांसाच्या बाजारात जे मास विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकबुध्दीला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न विचारता खा.
26 कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी तिच्यावरील सर्व काही प्रभूचे आहे.”
27 विश्वास ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हांला जेवावयास बोलाविले आणि तुम्हांस जावेसे वाटले तर सद्सद्वविवेकबुद्धिने कोणतेही प्रश्न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
28 परंतु जर कोणी तुम्हांस सांगितले की, ‘हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,’ तर विवेकबुद्धिसाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
29 आणि जेव्हा मी ‘विवेक’ म्हणतो तो स्वत:चा असे मी म्हणत नाही तर इतरांचा. आणि हेच फक्त एक कारण आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिने न्याय का करावा?
30 जर मी आभारपूर्वक अन्र खातो तर माइयावर टीका होऊ नये. कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
31 म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा.
32 यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.
33 जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×