Bible Versions
Bible Books

1 Kings 8:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.
2 2 तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्या विशेष उत्सवाचे होते.
3 3 इस्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.
4 4 त्याबरोबरच सभामंडप आणि तिथली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी घेतली. या कामात याजकांना लेवींनी मदत केली.
5 5 राजा शलमोन इस्राएलचे सर्व लोक करार कोशाच्या समोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते.
6 6 मद याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
7 7 करुबांचे पंख पवित्र करारकोशावर पसरलेले होते. पवित्र कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते.
8 8 हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.
9 9 करारकोशाच्या आता दोन शिलालेख होते. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
10 10 अतिपवित्र गाभाऱ्यातहा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले.
11 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.
12 12 तेव्हा शलमोन म्हणाला,“आकाशात सूर्य तळपतो तो परमेश्वरामुळे, पण तो स्वत:मात्र काळोख्या ढगात राहत
13 13 तुला युगानुयूग राहाण्यासाठी हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
14 14 सर्व इस्राएल लोक तेथे उभे होते. त्या समुदायाकडे वळून शलमोनाने देवाला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगितले.
15 15 शलमोन राजाने मग एक दीर्घ प्रार्थना म्हटली. ती अशी;“इस्राएलचा परमेश्वर देव महान आहे. माझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने सर्व काही केले. परमेश्वर माझ्या वडीलांना म्हणाला,
16 16 “माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’
17 17 “इस्राएलच्या परमेश्वर देवाच्या सन्मानर्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या फार मनात होते.
18 18 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘मंदिर उभारण्याची तुझी तीव्र इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.
19 19 पण तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझा मुलगा हे मंदिर उभारुन दाखवील.’
20 20 “परमेश्वराने अशा पध्दातीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.
21 21 त्यात पवित्र करारकोशासाठी एक गाभारा करवून घेतला आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांशील केलेला करार आहे. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले तेव्हा केलेला तो करार यात आहे.”
22 22 एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात
23 23 शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
24 24 माझे वडील दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करुन दाखवलेस. आपल्या मुखाने तू वनच दिलेस आणि तुझ्याच सामर्थ्यामुळे ते आज प्रत्यक्षात आले आहे.
25 25 माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालने केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’
26 26 परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
27 27 “पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.
28 28 पण कृपाकरुन माझी प्रार्थना कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
29 29 पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक.
30 30 परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.
31 31 “कोणाच्या हातून कुणाच्या विरुद्व काही अपराध घडल्यास त्याला या वेदीपुढे आणण्यात येईल. तो दुखावलेला माणूस त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविरुद्व शापवाणी उच्चारील तो निरपराध असेल तर तो तशी गवाही देईल. आपण निर्दोष असल्याचे तो शपर्थपूर्वक सांगेल.
32 32 तेव्हा तू ते स्वार्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. तो जर निरपराध असेल तर त्याच्या चांगुलपणाच्या प्रमाणात त्याला बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर.
33 33 “कधी इस्राएलच्या लोकांच्या हातून पाप घडले तर शत्रू त्यांचा पराभव करील. अशा वेळी हे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन या मंदिरात प्रार्थना करतील, तुझी स्तोत्रे गातील.
34 34 तेव्हा स्वर्गातून ती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. जो देश त्यांच्या पूर्वजांना तू दिलास तो त्यांना परत दे.
35 35 “कधी त्यांच्या पापाचा दंड म्हणून तू त्यांच्या भूमीवर दुष्काळ पाडशील तेव्हा ते या ठिकाणाकडे येऊन तुझी पार्थना करतील तुझ्या नावाची स्तुती करतील. ते त्यांच्या पापांपासून परावृत होतील.
36 36 तेव्हा स्वर्गातून त्यांची विनवणी ऐकून त्यांना क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव. आणि परमेश्वरा, तू त्यांना दिलेल्या भूमीवर पुन्हा पहिल्यासारखाच पाऊस पडू दे.
37 37 “कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही. किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड येऊन सगळे पीक फस्त करील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील. किंवा एखाद्या दुख्याने लोक हैराण होतील.
38 38 असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली.
39 39 तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
40 40 आमच्या पूर्वचांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून भय धरुन राहावे म्हणून एवढे कर.
41 41 “तुझी थोरवी आणि सामर्थ्य इतर लोकांच्याही कानावर जाईल. मग ते दूरदूरच्या ठिकाणांहून या मंदिरात प्रार्थनेसाठी येतील.
42 42
43 43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.
44 44 “कधी तू आपल्या लोकांना शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझी प्रार्थना करतील.
45 45 तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना मदत कर.
46 46 “लोकांच्या हातून काही पापही होईल. मी असं म्हणतो, कारण माणसाचा तो स्वभावच आहे. अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करुन दूरदेशी नेतील.
47 47 तिथे गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चात्ताप होईल आणि ते प्रार्थना करतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले’ अशी ते कबुली देतील.
48 48 ते कोठेतरी दूरच्या देशात असतील पण ते जर परराज्यात असताना अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेल्या या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
49 49 तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक.
50 50 त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुध्द गेल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंमध्ये त्यांच्या बद्दल दया उत्पन्न कर.
51 51 ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस तापलेल्या भट्टीतून बाहेर काढावे तसे त्यांना सोडवलेस हे लक्षात असू दे.
52 52 “परमेश्वर देवा, माझी आणि या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकुरुन ऐक. त्यांनी केव्हाही याचना केली तरी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.
53 53 पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करुन तू यांना आपले म्हटले आहेस. तू आम्हाला एवढे कबूल केले आहेस. मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.
54 54 शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.
55 55 मग त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद द्यावेत अशी मोठ्या आवाजात देवाला विनंती केली. शलमोन पुढे म्हणाला.”
56 56 “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत त्याने आपल्या फायद्याची अनेक वचने दिली होती. ती परमेश्वराने सर्वच्यासर्व खरी करुन दाखवली आहेत.
57 57 आपल्या पूर्वजांना त्याने साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हाला कधीही अंतर देऊ नये.
58 58 आम्ही त्याला अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.
59 59 आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
60 60 परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल.
61 61 तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”
62 62 मग राजासहित सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरा समोर यज्ञबली अर्पण केले.
63 63 शलमोनाने 22,000 गुरे आणि 1, 20,000 मेंढरे मारली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वराला अर्पण केले.
64 64 मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.
65 65 शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
66 66 नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायाला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराच्या सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.
1 Then H227 Solomon H8010 assembled H6950 H853 the elders H2205 of Israel, H3478 and H853 all H3605 the heads H7218 of the tribes, H4294 the chief H5387 of the fathers H1 of the children H1121 of Israel, H3478 unto H413 king H4428 Solomon H8010 in Jerusalem, H3389 that they might bring up H5927 H853 the ark H727 of the covenant H1285 of the LORD H3068 out of the city H4480 H5892 of David, H1732 which H1931 is Zion. H6726
2 And all H3605 the men H376 of Israel H3478 assembled themselves H6950 unto H413 king H4428 Solomon H8010 at the feast H2282 in the month H3391 Ethanim, H388 which H1931 is the seventh H7637 month. H2320
3 And all H3605 the elders H2205 of Israel H3478 came, H935 and the priests H3548 took up H5375 H853 the ark. H727
4 And they brought up H5927 H853 the ark H727 of the LORD, H3068 and the tabernacle H168 of the congregation, H4150 and all H3605 the holy H6944 vessels H3627 that H834 were in the tabernacle, H168 even those did the priests H3548 and the Levites H3881 bring up. H5927
5 And king H4428 Solomon, H8010 and all H3605 the congregation H5712 of Israel, H3478 that were assembled H3259 unto H5921 him, were with H854 him before H6440 the ark, H727 sacrificing H2076 sheep H6629 and oxen, H1241 that H834 could not H3808 be told H5608 nor H3808 numbered H4487 for multitude H4480 H7230 .
6 And the priests H3548 brought in H935 H853 the ark H727 of the covenant H1285 of the LORD H3068 unto H413 his place, H4725 into H413 the oracle H1687 of the house, H1004 to H413 the most H6944 holy H6944 place, even under H413 H8478 the wings H3671 of the cherubims. H3742
7 For H3588 the cherubims H3742 spread forth H6566 their two wings H3671 over H413 the place H4725 of the ark, H727 and the cherubims H3742 covered H5526 H5921 the ark H727 and the staves H905 thereof above H4480 H4605 .
8 And they drew out H748 the staves, H905 that the ends H7218 of the staves H905 were seen H7200 out H4480 in the holy H6944 place before H5921 H6440 the oracle, H1687 and they were not H3808 seen H7200 without: H2351 and there H8033 they are H1961 unto H5704 this H2088 day. H3117
9 There was nothing H369 in the ark H727 save H7535 the two H8147 tables H3871 of stone, H68 which H834 Moses H4872 put H5117 there H8033 at Horeb, H2722 when H834 the LORD H3068 made H3772 a covenant with H5973 the children H1121 of Israel, H3478 when they came out H3318 of the land H4480 H776 of Egypt. H4714
10 And it came to pass, H1961 when the priests H3548 were come out H3318 of H4480 the holy H6944 place , that the cloud H6051 filled H4390 H853 the house H1004 of the LORD, H3068
11 So that the priests H3548 could H3201 not H3808 stand H5975 to minister H8334 because H4480 H6440 of the cloud: H6051 for H3588 the glory H3519 of the LORD H3068 had filled H4390 H853 the house H1004 of the LORD. H3068
12 Then H227 spoke H559 Solomon, H8010 The LORD H3068 said H559 that he would dwell H7931 in the thick darkness. H6205
13 I have surely built H1129 H1129 thee a house H1004 to dwell in, H2073 a settled place H4349 for thee to abide in H3427 forever. H5769
14 And the king H4428 turned H5437 H853 his face H6440 about , and blessed H1288 H853 all H3605 the congregation H6951 of Israel: H3478 (and all H3605 the congregation H6951 of Israel H3478 stood; H5975 )
15 And he said, H559 Blessed H1288 be the LORD H3068 God H430 of Israel, H3478 which H834 spoke H1696 with his mouth H6310 unto H854 David H1732 my father, H1 and hath with his hand H3027 fulfilled H4390 it , saying, H559
16 Since H4480 the day H3117 that H834 I brought forth H3318 H853 my people H5971 H853 Israel H3478 out of Egypt H4480 H4714 , I chose H977 no H3808 city H5892 out of all H4480 H3605 the tribes H7626 of Israel H3478 to build H1129 a house, H1004 that my name H8034 might be H1961 therein; H8033 but I chose H977 David H1732 to be H1961 over H5921 my people H5971 Israel. H3478
17 And it was H1961 in H5973 the heart H3824 of David H1732 my father H1 to build H1129 a house H1004 for the name H8034 of the LORD H3068 God H430 of Israel. H3478
18 And the LORD H3068 said H559 unto H413 David H1732 my father, H1 Whereas H3282 H834 it was H1961 in H5973 thine heart H3824 to build H1129 a house H1004 unto my name, H8034 thou didst well H2895 that H3588 it was H1961 in H5973 thine heart. H3824
19 Nevertheless H7535 thou H859 shalt not H3808 build H1129 the house; H1004 but H3588 H518 thy son H1121 that shall come forth H3318 out of thy loins H4480 H2504 , he H1931 shall build H1129 the house H1004 unto my name. H8034
20 And the LORD H3068 hath performed H6965 H853 his word H1697 that H834 he spoke, H1696 and I am risen up H6965 in the room H8478 of David H1732 my father, H1 and sit H3427 on H5921 the throne H3678 of Israel, H3478 as H834 the LORD H3068 promised, H1696 and have built H1129 a house H1004 for the name H8034 of the LORD H3068 God H430 of Israel. H3478
21 And I have set H7760 there H8033 a place H4725 for the ark, H727 wherein H834 H8033 is the covenant H1285 of the LORD, H3068 which H834 he made H3772 with H5973 our fathers, H1 when he brought them out H3318 H853 of the land H4480 H776 of Egypt. H4714
22 And Solomon H8010 stood H5975 before H6440 the altar H4196 of the LORD H3068 in the presence H5048 of all H3605 the congregation H6951 of Israel, H3478 and spread forth H6566 his hands H3709 toward heaven: H8064
23 And he said, H559 LORD H3068 God H430 of Israel, H3478 there is no H369 God H430 like thee, H3644 in heaven H8064 above H4480 H4605 , or on H5921 earth H776 beneath H4480 H8478 , who keepest H8104 covenant H1285 and mercy H2617 with thy servants H5650 that walk H1980 before H6440 thee with all H3605 their heart: H3820
24 Who H834 hast kept H8104 with thy servant H5650 David H1732 my father H1 H853 that H834 thou promisedst H1696 him : thou spakest H1696 also with thy mouth, H6310 and hast fulfilled H4390 it with thine hand, H3027 as it is this H2088 day. H3117
25 Therefore now, H6258 LORD H3068 God H430 of Israel, H3478 keep H8104 with thy servant H5650 David H1732 my father H1 H853 that H834 thou promisedst H1696 him, saying, H559 There shall not H3808 fail H3772 thee a man H376 in my sight H4480 H6440 to sit H3427 on H5921 the throne H3678 of Israel; H3478 so H7535 that H518 thy children H1121 take heed to H8104 H853 their way, H1870 that they walk H1980 before H6440 me as H834 thou hast walked H1980 before H6440 me.
26 And now, H6258 O God H430 of Israel, H3478 let thy word, H1697 I pray thee, H4994 be verified, H539 which H834 thou spakest H1696 unto thy servant H5650 David H1732 my father. H1
27 But H3588 will God H430 indeed H552 dwell H3427 on H5921 the earth H776 ? behold, H2009 the heaven H8064 and heaven H8064 of heavens H8064 cannot H3808 contain H3557 thee ; how much less H637 H3588 this H2088 house H1004 that H834 I have built H1129 ?
28 Yet have thou respect H6437 unto H413 the prayer H8605 of thy servant, H5650 and to H413 his supplication, H8467 O LORD H3068 my God, H430 to hearken H8085 unto H413 the cry H7440 and to H413 the prayer, H8605 which H834 thy servant H5650 prayeth H6419 before H6440 thee today: H3117
29 That thine eyes H5869 may be H1961 open H6605 toward H413 this H2088 house H1004 night H3915 and day, H3117 even toward H413 the place H4725 of which H834 thou hast said, H559 My name H8034 shall be H1961 there: H8033 that thou mayest hearken H8085 unto H413 the prayer H8605 which H834 thy servant H5650 shall make H6419 toward H413 this H2088 place. H4725
30 And hearken H8085 thou to H413 the supplication H8467 of thy servant, H5650 and of thy people H5971 Israel, H3478 when H834 they shall pray H6419 toward H413 this H2088 place: H4725 and hear H8085 thou H859 in H413 heaven H8064 thy dwelling H3427 place: H4725 and when thou hearest, H8085 forgive. H5545
31 H853 If H834 any man H376 trespass H2398 against his neighbor, H7453 and an oath H423 be laid H5377 upon him to cause him to swear, H422 and the oath H422 come H935 before H6440 thine altar H4196 in this H2088 house: H1004
32 Then hear H8085 thou H859 in heaven, H8064 and do, H6213 and judge H8199 H853 thy servants, H5650 condemning H7561 the wicked, H7563 to bring H5414 his way H1870 upon his head; H7218 and justifying H6663 the righteous, H6662 to give H5414 him according to his righteousness. H6666
33 When thy people H5971 Israel H3478 be smitten down H5062 before H6440 the enemy, H341 because H834 they have sinned H2398 against thee , and shall turn again H7725 to H413 thee , and confess H3034 H853 thy name, H8034 and pray, H6419 and make supplication H2603 unto H413 thee in this H2088 house: H1004
34 Then hear H8085 thou H859 in heaven, H8064 and forgive H5545 the sin H2403 of thy people H5971 Israel, H3478 and bring them again H7725 unto H413 the land H127 which H834 thou gavest H5414 unto their fathers. H1
35 When heaven H8064 is shut up, H6113 and there is H1961 no H3808 rain, H4306 because H3588 they have sinned H2398 against thee ; if they pray H6419 toward H413 this H2088 place, H4725 and confess H3034 H853 thy name, H8034 and turn H7725 from their sin H4480 H2403 , when H3588 thou afflictest H6031 them:
36 Then hear H8085 thou H859 in heaven, H8064 and forgive H5545 the sin H2403 of thy servants, H5650 and of thy people H5971 Israel, H3478 that H3588 thou teach H3384 them H853 the H834 good H2896 way H1870 wherein they should walk, H1980 and give H5414 rain H4306 upon H5921 thy land, H776 which H834 thou hast given H5414 to thy people H5971 for an inheritance. H5159
37 If H3588 there be H1961 in the land H776 famine, H7458 if H3588 there be H1961 pestilence, H1698 blasting, H7711 mildew, H3420 locust, H697 or if H3588 there be H1961 caterpillar; H2625 if H3588 their enemy H341 besiege H6887 them in the land H776 of their cities; H8179 whatsoever H3605 plague, H5061 whatsoever H3605 sickness H4245 there be ;
38 What H3605 prayer H8605 and supplication H8467 soever H3605 H834 be H1961 made by any H3605 man, H120 or by all H3605 thy people H5971 Israel, H3478 which H834 shall know H3045 every man H376 the plague H5061 of his own heart, H3824 and spread forth H6566 his hands H3709 toward H413 this H2088 house: H1004
39 Then hear H8085 thou H859 in heaven H8064 thy dwelling H3427 place, H4349 and forgive, H5545 and do, H6213 and give H5414 to every man H376 according to H3605 his ways, H1870 whose H834 H853 heart H3824 thou knowest; H3045 ( for H3588 thou, H859 even thou only, H905 knowest H3045 H853 the hearts H3824 of all H3605 the children H1121 of men; H120 )
40 That H4616 they may fear H3372 thee all H3605 the days H3117 that H834 they H1992 live H2416 in H5921 H6440 the land H127 which H834 thou gavest H5414 unto our fathers. H1
41 Moreover H1571 concerning H413 a stranger, H5237 that H834 is not H3808 of thy people H4480 H5971 Israel, H3478 but cometh H935 out of a far country H4480 H776 H7350 for thy name's sake H4616; H8034
42 ( For H3588 they shall hear of H8085 H853 thy great H1419 name, H8034 and of thy strong H2389 hand, H3027 and of thy stretched out H5186 arm; H2220 ) when he shall come H935 and pray H6419 toward H413 this H2088 house; H1004
43 Hear H8085 thou H859 in heaven H8064 thy dwelling H3427 place, H4349 and do H6213 according to all H3605 that H834 the stranger H5237 calleth H7121 to H413 thee for: that H4616 all H3605 people H5971 of the earth H776 may know H3045 H853 thy name, H8034 to fear H3372 thee , as do thy people H5971 Israel; H3478 and that they may know H3045 that H3588 this H2088 house, H1004 which H834 I have built, H1129 is called H7121 by H5921 thy name. H8034
44 If H3588 thy people H5971 go out H3318 to battle H4421 against H5921 their enemy, H341 whithersoever H1870 H834 thou shalt send H7971 them , and shall pray H6419 unto H413 the LORD H3068 toward H1870 the city H5892 which H834 thou hast chosen, H977 and toward the house H1004 that H834 I have built H1129 for thy name: H8034
45 Then hear H8085 thou in heaven H8064 H853 their prayer H8605 and their supplication, H8467 and maintain H6213 their cause. H4941
46 If H3588 they sin H2398 against thee, ( for H3588 there is no H369 man H120 that H834 sinneth H2398 not, H3808 ) and thou be angry H599 with them , and deliver H5414 them to H6440 the enemy, H341 so that they carry them away H7617 captives H7617 unto H413 the land H776 of the enemy, H341 far H7350 or H176 near; H7138
47 Yet if they shall bethink themselves H7725 H413 H3820 in the land H776 whither H834 H8033 they were carried captives, H7617 and repent, H7725 and make supplication H2603 unto H413 thee in the land H776 of them that carried them captives, H7617 saying, H559 We have sinned, H2398 and have done perversely, H5753 we have committed wickedness; H7561
48 And so return H7725 unto H413 thee with all H3605 their heart, H3824 and with all H3605 their soul, H5315 in the land H776 of their enemies, H341 which H834 led them away captive H7617 H853 , and pray H6419 unto H413 thee toward H1870 their land, H776 which H834 thou gavest H5414 unto their fathers, H1 the city H5892 which H834 thou hast chosen, H977 and the house H1004 which H834 I have built H1129 for thy name: H8034
49 Then hear H8085 thou H853 their prayer H8605 and their supplication H8467 in heaven H8064 thy dwelling H3427 place, H4349 and maintain H6213 their cause, H4941
50 And forgive H5545 thy people H5971 that H834 have sinned H2398 against thee , and all H3605 their transgressions H6588 wherein H834 they have transgressed H6586 against thee , and give H5414 them compassion H7356 before H6440 them who carried them captive, H7617 that they may have compassion on H7355 them:
51 For H3588 they H1992 be thy people, H5971 and thine inheritance, H5159 which H834 thou broughtest forth H3318 out of Egypt H4480 H4714 , from the midst H4480 H8432 of the furnace H3564 of iron: H1270
52 That thine eyes H5869 may be H1961 open H6605 unto H413 the supplication H8467 of thy servant, H5650 and unto H413 the supplication H8467 of thy people H5971 Israel, H3478 to hearken H8085 unto H413 them in all H3605 that they call H7121 for unto H413 thee.
53 For H3588 thou H859 didst separate H914 them from among all H4480 H3605 the people H5971 of the earth, H776 to be thine inheritance, H5159 as H834 thou spakest H1696 by the hand H3027 of Moses H4872 thy servant, H5650 when thou broughtest H3318 H853 our fathers H1 out of Egypt H4480 H4714 , O Lord H136 GOD. H3068
54 And it was H1961 so , that when Solomon H8010 had made an end H3615 of praying H6419 H853 all H3605 this H2063 prayer H8605 and supplication H8467 unto H413 the LORD, H3068 he arose H6965 from before H4480 H6440 the altar H4196 of the LORD, H3068 from kneeling H4480 H3766 on H5921 his knees H1290 with his hands H3709 spread up H6566 to heaven. H8064
55 And he stood, H5975 and blessed H1288 H853 all H3605 the congregation H6951 of Israel H3478 with a loud H1419 voice, H6963 saying, H559
56 Blessed H1288 be the LORD, H3068 that H834 hath given H5414 rest H4496 unto his people H5971 Israel, H3478 according to all H3605 that H834 he promised: H1696 there hath not H3808 failed H5307 one H259 word H1697 of all H4480 H3605 his good H2896 promise, H1697 which H834 he promised H1696 by the hand H3027 of Moses H4872 his servant. H5650
57 The LORD H3068 our God H430 be H1961 with H5973 us, as H834 he was H1961 with H5973 our fathers: H1 let him not H408 leave H5800 us, nor H408 forsake H5203 us:
58 That he may incline H5186 our hearts H3824 unto H413 him , to walk H1980 in all H3605 his ways, H1870 and to keep H8104 his commandments, H4687 and his statutes, H2706 and his judgments, H4941 which H834 he commanded H6680 H853 our fathers. H1
59 And let these H428 my words, H1697 wherewith H834 I have made supplication H2603 before H6440 the LORD, H3068 be H1961 nigh H7138 unto H413 the LORD H3068 our God H430 day H3119 and night, H3915 that he maintain H6213 the cause H4941 of his servant, H5650 and the cause H4941 of his people H5971 Israel H3478 at all times, H3117 as the matter H1697 shall require: H3117
60 That H4616 all H3605 the people H5971 of the earth H776 may know H3045 that H3588 the LORD H3068 is God, H430 and that there is none H369 else. H5750
61 Let your heart H3824 therefore be H1961 perfect H8003 with H5973 the LORD H3068 our God, H430 to walk H1980 in his statutes, H2706 and to keep H8104 his commandments, H4687 as at this H2088 day. H3117
62 And the king, H4428 and all H3605 Israel H3478 with H5973 him, offered H2076 sacrifice H2077 before H6440 the LORD. H3068
63 And Solomon H8010 offered H2076 H853 a sacrifice H2077 of peace offerings, H8002 which H834 he offered H2076 unto the LORD, H3068 two H8147 and twenty H6242 thousand H505 oxen, H1241 and a hundred H3967 and twenty H6242 thousand H505 sheep. H6629 So the king H4428 and all H3605 the children H1121 of Israel H3478 dedicated H2596 H853 the house H1004 of the LORD. H3068
64 The same H1931 day H3117 did the king H4428 hallow H6942 H853 the middle H8432 of the court H2691 that H834 was before H6440 the house H1004 of the LORD: H3068 for H3588 there H8033 he offered H6213 H853 burnt offerings, H5930 and meat offerings, H4503 and the fat H2459 of the peace offerings: H8002 because H3588 the brazen H5178 altar H4196 that H834 was before H6440 the LORD H3068 was too little H6996 to receive H4480 H3557 H853 the burnt offerings, H5930 and meat offerings, H4503 and the fat H2459 of the peace offerings. H8002
65 And at that H1931 time H6256 Solomon H8010 held H6213 H853 a feast, H2282 and all H3605 Israel H3478 with H5973 him , a great H1419 congregation, H6951 from the entering in H4480 H935 of Hamath H2574 unto H5704 the river H5158 of Egypt, H4714 before H6440 the LORD H3068 our God, H430 seven H7651 days H3117 and seven H7651 days, H3117 even fourteen H702 H6240 days. H3117
66 On the eighth H8066 day H3117 he sent H7971 H853 the people H5971 away : and they blessed H1288 H853 the king, H4428 and went H1980 unto their tents H168 joyful H8056 and glad H2896 of heart H3820 for H5921 all H3605 the goodness H2896 that H834 the LORD H3068 had done H6213 for David H1732 his servant, H5650 and for Israel H3478 his people. H5971
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×