Bible Versions
Bible Books

2 Kings 17:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले.
2 2 परमेश्वराने ज्या कृत्यांचा निषेध केला होता तीच कृत्ये होशेने केली. पण या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
3 3 अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.
4 4 पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.
5 5 मग अश्शूरचा राजा इस्राएलमधून चाल करत शोमरोनमध्ये येऊन ठेपला. त्याने शोमरोनशी तीन वर्षे लढा दिला.
6 6 होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.
7 7 परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले.मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले.
8 8 इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावू लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली.
9 9 इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली.
10 10 प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले.
11 11 या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला.
12 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
13 13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”
14 14 पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वरा ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.
15 15 या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बाजवून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होत तेच ही राष्ट्रे करत होती.
16 16 परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली.
17 17 आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.
18 18 या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.
19 19 पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.
20 20 परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले.
21 21 दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले.
22 22 यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली.
23 23 परमेश्वराने त्यांना नजरेआड करीपर्यंत त्यांनी पापे करणे सोडले नाही. परमेश्वराने असे होणार हे भाकीत वर्तवले होतेच. ते सांगायला त्याने संदेष्ट्यांनाही पाठवले होते. तेव्हा इस्राएल लोकांची त्यांच्या प्रदेशातून अश्शूरमध्ये हकालपट्टी करण्यात आली. आजतगायत ते तिथेच आहेत.
24 24 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना शोमरोनमधून बाहेर काढले. त्यानंतर या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हामाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनमध्ये त्यांना वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि त्या भोवतालच्या गावांमध्ये ते राहू लागले.
25 25 या लोकांनी त्या प्रदेशात राहू लागल्यावर परमेश्वराचा मान राखला नाही. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायला परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या सिंहांनी काहीजणांचा बळी घेतला.
26 26 काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”
27 27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “शोमरोनमधून काही याजकांना तुम्ही आणले आहे. तरी अटक करुन आणलेल्यांपैकी एका याजकाला तिथे पाठवा. त्याला तिथे राहू द्या. तो मग लोकांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकवेल.
28 28 तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
29 29 पण या लोकांनी स्वत:च्या दैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पुजास्थळामध्ये त्या ठेवल्या. सर्वत्र त्यांनी असेच केले.
30 30 बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली,
31 31 अळी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावी यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.
32 32 पण तरी त्यांनी परमेश्वराविषयी आदर बाळगला. उंचस्थानातील पुजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत.
33 33 परमेश्वराविषयी आदर बाळगून ते आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रांत ते करीत तसेच इथेही करीत.
34 34 आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत.
35 35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत.
36 36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा.
37 37 त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये.
38 38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
39 39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”
40 40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.
41 41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
1 In the twelfth H8147 H6240 year H8141 of Ahaz H271 king H4428 of Judah H3063 began Hoshea H1954 the son H1121 of Elah H425 to reign H4427 in Samaria H8111 over H5921 Israel H3478 nine H8672 years. H8141
2 And he did H6213 that which was evil H7451 in the sight H5869 of the LORD, H3068 but H7535 not H3808 as the kings H4428 of Israel H3478 that H834 were H1961 before H6440 him.
3 Against H5921 him came up H5927 Shalmaneser H8022 king H4428 of Assyria; H804 and Hoshea H1954 became H1961 his servant, H5650 and gave H7725 him presents. H4503
4 And the king H4428 of Assyria H804 found H4672 conspiracy H7195 in Hoshea: H1954 for he had sent H7971 messengers H4397 to H413 So H5471 king H4428 of Egypt, H4714 and brought H5927 no H3808 present H4503 to the king H4428 of Assyria, H804 as he had done year H8141 by year: H8141 therefore the king H4428 of Assyria H804 shut him up, H6113 and bound H631 him in prison H1004 H3608 .
5 Then the king H4428 of Assyria H804 came up H5927 throughout all H3605 the land, H776 and went up H5927 to Samaria, H8111 and besieged H6696 H5921 it three H7969 years. H8141
6 In the ninth H8671 year H8141 of Hoshea H1954 the king H4428 of Assyria H804 took H3920 H853 Samaria, H8111 and carried Israel away H1540 H853 H3478 into Assyria, H804 and placed H3427 them in Halah H2477 and in Habor H2249 by the river H5104 of Gozan, H1470 and in the cities H5892 of the Medes. H4074
7 For so it was, H1961 that H3588 the children H1121 of Israel H3478 had sinned H2398 against the LORD H3068 their God, H430 which had brought them up H5927 H853 out of the land H4480 H776 of Egypt, H4714 from under H4480 H8478 the hand H3027 of Pharaoh H6547 king H4428 of Egypt, H4714 and had feared H3372 other H312 gods, H430
8 And walked H1980 in the statutes H2708 of the heathen, H1471 whom H834 the LORD H3068 cast out H3423 from before H4480 H6440 the children H1121 of Israel, H3478 and of the kings H4428 of Israel, H3478 which H834 they had made. H6213
9 And the children H1121 of Israel H3478 did secretly H2644 those things H1697 that H834 were not H3808 right H3651 against H5921 the LORD H3068 their God, H430 and they built H1129 them high places H1116 in all H3605 their cities, H5892 from the tower H4480 H4026 of the watchmen H5341 to H5704 the fenced H4013 city. H5892
10 And they set them up H5324 images H4676 and groves H842 in H5921 every H3605 high H1364 hill, H1389 and under H8478 every H3605 green H7488 tree: H6086
11 And there H8033 they burnt incense H6999 in all H3605 the high places, H1116 as did the heathen H1471 whom H834 the LORD H3068 carried away H1540 before H4480 H6440 them ; and wrought H6213 wicked H7451 things H1697 to provoke H3707 H853 the LORD H3068 to anger:
12 For they served H5647 idols, H1544 whereof H834 the LORD H3068 had said H559 unto them , Ye shall not H3808 do H6213 H853 this H2088 thing. H1697
13 Yet the LORD H3068 testified H5749 against Israel, H3478 and against Judah, H3063 by H3027 all H3605 the prophets, H5030 and by all H3605 the seers, H2374 saying, H559 Turn H7725 ye from your evil ways H4480 H1870, H7451 and keep H8104 my commandments H4687 and my statutes, H2708 according to all H3605 the law H8451 which H834 I commanded your fathers, H1 and which H834 I sent H7971 to H413 you by H3027 my servants H5650 the prophets. H5030
14 Notwithstanding they would not H3808 hear, H8085 but hardened H7185 H853 their necks, H6203 like to the neck H6203 of their fathers, H1 that H834 did not H3808 believe H539 in the LORD H3068 their God. H430
15 And they rejected H3988 H853 his statutes, H2706 and his covenant H1285 that H834 he made H3772 with H854 their fathers, H1 and his testimonies H5715 which H834 he testified H5749 against them ; and they followed H1980 H310 vanity, H1892 and became vain, H1891 and went after H310 the heathen H1471 that H834 were round about H5439 them, concerning whom H834 the LORD H3068 had charged H6680 them , that they should not H1115 do H6213 like them.
16 And they left H5800 H853 all H3605 the commandments H4687 of the LORD H3068 their God, H430 and made H6213 them molten images, H4541 even two H8147 calves, H5695 and made H6213 a grove, H842 and worshiped H7812 all H3605 the host H6635 of heaven, H8064 and served H5647 H853 Baal. H1168
17 And they caused H853 their sons H1121 and their daughters H1323 to pass through H5674 the fire, H784 and used H7080 divination H7081 and enchantments, H5172 and sold themselves H4376 to do H6213 evil H7451 in the sight H5869 of the LORD, H3068 to provoke him to anger. H3707
18 Therefore the LORD H3068 was very angry H599 H3966 with Israel, H3478 and removed H5493 them out of H4480 H5921 his sight: H6440 there was none H3808 left H7604 but H7535 the tribe H7626 of Judah H3063 only. H905
19 Also H1571 Judah H3063 kept H8104 not H3808 H853 the commandments H4687 of the LORD H3068 their God, H430 but walked H1980 in the statutes H2708 of Israel H3478 which H834 they made. H6213
20 And the LORD H3068 rejected H3988 all H3605 the seed H2233 of Israel, H3478 and afflicted H6031 them , and delivered H5414 them into the hand H3027 of spoilers, H8154 until H5704 H834 he had cast them out H7993 of his sight H4480 H6440 .
21 For H3588 he rent H7167 Israel H3478 from H4480 H5921 the house H1004 of David; H1732 and they made H853 Jeroboam H3379 the son H1121 of Nebat H5028 king: H4427 and Jeroboam H3379 drove H5080 H853 Israel H3478 from following H4480 H310 the LORD, H3068 and made them sin H2398 a great H1419 sin. H2401
22 For the children H1121 of Israel H3478 walked H1980 in all H3605 the sins H2403 of Jeroboam H3379 which H834 he did; H6213 they departed H5493 not H3808 from H4480 them;
23 Until H5704 H834 the LORD H3068 removed H5493 H853 Israel H3478 out of H4480 H5921 his sight, H6440 as H834 he had said H1696 by H3027 all H3605 his servants H5650 the prophets. H5030 So was Israel H3478 carried away H1540 out of H4480 H5921 their own land H127 to Assyria H804 unto H5704 this H2088 day. H3117
24 And the king H4428 of Assyria H804 brought H935 men from Babylon H4480 H894 , and from Cuthah H4480 H3575 , and from Ava H4480 H5755 , and from Hamath H4480 H2574 , and from Sepharvaim, H5617 and placed H3427 them in the cities H5892 of Samaria H8111 instead H8478 of the children H1121 of Israel: H3478 and they possessed H3423 H853 Samaria, H8111 and dwelt H3427 in the cities H5892 thereof.
25 And so it was H1961 at the beginning H8462 of their dwelling H3427 there, H8033 that they feared H3372 not H3808 H853 the LORD: H3068 therefore the LORD H3068 sent H7971 H853 lions H738 among them , which slew H2026 some of them.
26 Wherefore they spoke H559 to the king H4428 of Assyria, H804 saying, H559 The nations H1471 which H834 thou hast removed, H1540 and placed H3427 in the cities H5892 of Samaria, H8111 know H3045 not H3808 H853 the manner H4941 of the God H430 of the land: H776 therefore he hath sent H7971 H853 lions H738 among them, and, behold, H2009 they slay H4191 them, because H834 they know H3045 not H369 H853 the manner H4941 of the God H430 of the land. H776
27 Then the king H4428 of Assyria H804 commanded, H6680 saying, H559 Carry H1980 thither H8033 one H259 of the priests H4480 H3548 whom H834 ye brought H1540 from thence H4480 H8033 ; and let them go H1980 and dwell H3427 there, H8033 and let him teach H3384 them H853 the manner H4941 of the God H430 of the land. H776
28 Then one H259 of the priests H4480 H3548 whom H834 they had carried away H1540 from Samaria H4480 H8111 came H935 and dwelt H3427 in Bethel, H1008 and taught H3384 them how H349 they should fear H3372 H853 the LORD. H3068
29 Howbeit every nation H1471 H1471 made H6213 gods H430 of their own , and put H5117 them in the houses H1004 of the high places H1116 which H834 the Samaritans H8118 had made, H6213 every nation H1471 H1471 in their cities H5892 wherein H834 H8033 they H1992 dwelt. H3427
30 And the men H376 of Babylon H894 made H6213 H853 Succothbenoth, H5524 and the men H376 of Cuth H3575 made H6213 H853 Nergal, H5370 and the men H376 of Hamath H2574 made H6213 H853 Ashima, H807
31 And the Avites H5761 made H6213 Nibhaz H5026 and Tartak, H8662 and the Sepharvites H5617 burnt H8313 H853 their children H1121 in fire H784 to Adrammelech H152 and Anammelech, H6048 the gods H430 of Sepharvaim. H5617
32 So they feared H1961 H3372 H853 the LORD, H3068 and made H6213 unto themselves of the lowest H4480 H7098 of them priests H3548 of the high places, H1116 which sacrificed H6213 for them in the houses H1004 of the high places. H1116
33 They feared H1961 H3372 H853 the LORD, H3068 and served H1961 H5647 their own gods, H430 after the manner H4941 of the nations H1471 whom H834 H853 they carried away H1540 from thence H4480 H8033 .
34 Unto H5704 this H2088 day H3117 they H1992 do H6213 after the former H7223 manners: H4941 they fear H3372 not H369 H853 the LORD, H3068 neither H369 do H6213 they after their statutes, H2708 or after their ordinances, H4941 or after the law H8451 and commandment H4687 which H834 the LORD H3068 commanded H6680 H853 the children H1121 of Jacob, H3290 whom H834 he named H7760 H8034 Israel; H3478
35 With H854 whom the LORD H3068 had made H3772 a covenant, H1285 and charged H6680 them, saying, H559 Ye shall not H3808 fear H3372 other H312 gods, H430 nor H3808 bow yourselves H7812 to them, nor H3808 serve H5647 them, nor H3808 sacrifice H2076 to them:
36 But H3588 H518 H853 the LORD, H3068 who H834 brought you up H5927 H853 out of the land H4480 H776 of Egypt H4714 with great H1419 power H3581 and a stretched out H5186 arm, H2220 him shall ye fear, H3372 and him shall ye worship, H7812 and to him shall ye do sacrifice. H2076
37 And the statutes, H2706 and the ordinances, H4941 and the law, H8451 and the commandment, H4687 which H834 he wrote H3789 for you , ye shall observe H8104 to do H6213 forevermore H3605 H3117 ; and ye shall not H3808 fear H3372 other H312 gods. H430
38 And the covenant H1285 that H834 I have made H3772 with H854 you ye shall not H3808 forget; H7911 neither H3808 shall ye fear H3372 other H312 gods. H430
39 But H3588 H518 H853 the LORD H3068 your God H430 ye shall fear; H3372 and he H1931 shall deliver H5337 you out of the hand H4480 H3027 of all H3605 your enemies. H341
40 Howbeit they did not H3808 hearken, H8085 but H3588 H518 they H1992 did H6213 after their former H7223 manner. H4941
41 So these H428 nations H1471 feared H1961 H3372 H853 the LORD, H3068 and served H5647 their graven images, H6456 both H1571 their children, H1121 and their children's H1121 children: H1121 as H834 did H6213 their fathers, H1 so do H6213 they H1992 unto H5704 this H2088 day. H3117
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×