Bible Versions
Bible Books

Job 42:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 नंतर ईयोबने परमेश्वराला उत्तर दिले, तो म्हणाला:
2 2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे. तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.
3 3 परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास. ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखेबोलतो आहे?’ परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत तव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
4 4 “परमेश्वरा, तू मला म्हणालास, ‘ईयोब, तू ऐक, मी बोलेन. मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे.’
5 5 “परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते. परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
6 6 आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
7 7 परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, “मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.
8 8 म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हाला योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मुर्ख होता म्हणून तुम्हाला शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.”
9 9 तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.
10 10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
11 11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबबरोबर भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडाआणि सोन्याची अंगठी दिली.
12 12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत.
13 13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.
14 14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले.
15 15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.
16 16 अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला.
17 17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.
1 Then Job H347 answered H6030 H853 the LORD, H3068 and said, H559
2 I know H3045 that H3588 thou canst do H3201 every H3605 thing , and that no H3808 thought H4209 can be withheld H1219 from H4480 thee.
3 Who H4310 is he H2088 that hideth H5956 counsel H6098 without H1097 knowledge H1847 ? therefore H3651 have I uttered H5046 that I understood H995 not; H3808 things too wonderful H6381 for H4480 me , which I knew H3045 not. H3808
4 Hear H8085 , I beseech thee, H4994 and I H595 will speak: H1696 I will demand H7592 of thee , and declare H3045 thou unto me.
5 I have heard H8085 of thee by the hearing H8088 of the ear: H241 but now H6258 mine eye H5869 seeth H7200 thee.
6 Wherefore H5921 H3651 I abhor H3988 myself , and repent H5162 in H5921 dust H6083 and ashes. H665
7 And it was H1961 so , that after H310 the LORD H3068 had spoken H1696 H853 these H428 words H1697 unto H413 Job, H347 the LORD H3068 said H559 to H413 Eliphaz H464 the Temanite, H8489 My wrath H639 is kindled H2734 against thee , and against thy two H8147 friends: H7453 for H3588 ye have not H3808 spoken H1696 of H413 me the thing that is right, H3559 as my servant H5650 Job H347 hath .
8 Therefore take H3947 unto you now H6258 seven H7651 bullocks H6499 and seven H7651 rams, H352 and go H1980 to H413 my servant H5650 Job, H347 and offer up H5927 for H1157 yourselves a burnt offering; H5930 and my servant H5650 Job H347 shall pray H6419 for H5921 you: for H3588 H518 him H6440 will I accept: H5375 lest H1115 I deal H6213 with H5973 you after your folly, H5039 in that H3588 ye have not H3808 spoken H1696 of H413 me the thing which is right, H3559 like my servant H5650 Job. H347
9 So Eliphaz H464 the Temanite H8489 and Bildad H1085 the Shuhite H7747 and Zophar H6691 the Naamathite H5284 went, H1980 and did H6213 according as H834 the LORD H3068 commanded H1696 H413 them : the LORD H3068 also accepted H5375 H6440 H853 Job. H347
10 And the LORD H3068 turned H7725 H853 the captivity H7622 of Job, H347 when he prayed H6419 for H1157 his friends: H7453 also the LORD H3068 gave H3254 Job H347 H853 twice H4932 as much as he had before H3605 H834 .
11 Then came H935 there unto H413 him all H3605 his brethren, H251 and all H3605 his sisters, H269 and all H3605 they that had been of his acquaintance H3045 before, H6440 and did eat H398 bread H3899 with H5973 him in his house: H1004 and they bemoaned H5110 him , and comforted H5162 him over H5921 all H3605 the evil H7451 that H834 the LORD H3068 had brought H935 upon H5921 him : every man H376 also gave H5414 him a piece of money H7192 H259 , and every one H376 an H259 earring H5141 of gold. H2091
12 So the LORD H3068 blessed H1288 H853 the latter end H319 of Job H347 more than his beginning H4480 H7225 : for he had H1961 fourteen H702 H6240 thousand H505 sheep, H6629 and six H8337 thousand H505 camels, H1581 and a thousand H505 yoke H6776 of oxen, H1241 and a thousand H505 she asses. H860
13 He had H1961 also seven H7658 sons H1121 and three H7969 daughters. H1323
14 And he called H7121 the name H8034 of the first, H259 Jemima; H3224 and the name H8034 of the second, H8145 Kezia; H7103 and the name H8034 of the third, H7992 Keren- H7163 happuch.
15 And in all H3605 the land H776 were no H3808 women H802 found H4672 so fair H3303 as the daughters H1323 of Job: H347 and their father H1 gave H5414 them inheritance H5159 among H8432 their brethren. H251
16 After H310 this H2063 lived H2421 Job H347 a hundred H3967 and forty H705 years, H8141 and saw H7200 H853 his sons, H1121 and H853 his sons's H1121ons, H1121 even four H702 generations. H1755
17 So Job H347 died, H4191 being old H2205 and full H7649 of days. H3117
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×