Bible Versions
Bible Books

Numbers 9 (MRV) Marathi Old BSI Version

1 मिसरमधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. परमेश्वर म्हणाला,
2 2 “इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
3 3 ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्या अगोदर-संधी प्रकाशात-त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन करावे. त्यांनी ते ठरलेल्यावेळी आणि वल्हांडण सण पाळण्याच्या नियमाप्रमाणे करावे.”
4 4 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
5 5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या वाळवंटात संधीप्रकाशात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी हा सण पाळला; परमेश्वराने मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
6 6 परंतु काही लोकांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना कारण प्रेताला शिवल्यामुळे ते अशुद्ध झाले होते. म्हणून ते त्या दिवशी मोशे अहरोन ह्यांच्याकडे गेले.
7 7 ते लोक मोशेला म्हणले, “एका माणसाच्या प्रेताला आमचा स्पर्श झाला आम्ही अशुद्ध झालो. त्यामुळे ठरलेल्या वेळी परमेश्वराला अर्पणे करण्यास याजकांनी आम्हाला बंदी केली. तेव्हा इतर इस्राएल लोकाबरोबर आम्हाला अर्पणे करिता येत नाहीत!”
8 8 मोशे त्यांना म्हणाला, “ह्या संबंधी परमेश्वराचे काय म्हणणे आहे, हे मी त्याला विचारितो.”
9 9 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
10 10 “तू इस्राएल लोकांना हे सर्व सांग की हा नियम तुम्हा करिता तुमच्या वंशजाकरिता आहे; प्रेताला स्पर्श झाल्यामुळे एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस त्यावेळी दूरच्या प्रवासात असेल म्हणून त्याला ठरलेल्यावेळी वल्हांडण सण पाळता येत नसेल तरी;
11 11 त्याला वल्हांडण सण पाळता येईल; त्याने तो दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी संधी प्रकाशात साजरा करावा. त्यावेळी त्याने अर्पण केलेले कोंकरु, बेखमीर भाकर कडू भाजीपाला हे खावे;
12 12 त्याने भोजनातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; तसेच त्याने कोंकऱ्याचे कोणतेही हाड मोडू नये. त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळावेत.
13 13 परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही तो सण पाळू शकतो तर अशा माणसाने वल्हांडण सण ठरलेल्या वेळी पाळला नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे. तो अपराधी आहे म्हणून त्याला अवश्य शिक्षा व्हावी! कारण त्याने योग्य वेळी परमेश्वराला दान दिले नाही.
14 14 तुमच्यामध्ये राहाणाऱ्या एखाद्या विदेशी माणसाला तुमच्याबरोबर वल्हांडण सण पाळण्याची परमेश्वराला अर्पण देण्याची इच्छा असेल तर त्याला तसे करण्यास परवानगी आहे. परंतु तो त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळून साजरा करावा. प्रत्येकसाठी स्वदेशी किंवा परदेशी सणाचे नियम सारखेच आहेत.”
15 15 ज्या दिवशी पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा कोश असलेला तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी परमेश्वराच्या ढगाने त्याच्यावर छाया केली; रात्री तो पवित्र निवास मंडपावरील ढग अग्नि सारखा दिसला.
16 16 तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.
17 17 जेव्हा तो ढग पवित्र निवास मंडपावरील जागेवरुन हलत असे तेव्हा इस्राएल लोकही तळ हलवून त्याच्याप्रमाणे जात असत आणि जेव्हा तो थांबत असे तेव्हा त्याच ठिकाणी ते आपला तळ ठोकीत असत. अशा प्रकारे ते तळ ठोकीत असत.
18 18 अशा प्रकारे तळ कधी हलवावा कधी थांबून तळ कोठे ठोकावा हे परमेश्वर इस्राएल लोकांना दाखवीत असे. जोपर्यंत ढग पवित्र निवास मंडपावर राही तोपर्यंत इस्राएल लोक आपला मुक्काम तेथेच ठेवीत.
19 19 कधी कधी ढग पवित्र निवास मंडपावर बरेच दिवस राही तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून मुक्काम हलवीत नसत.
20 20 कधी कधी ढग थोडेच दिवस पवित्र निवास मंडपावर राही, तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत. ढग हालला की ते ढगामागे जात असत.
21 21 कधी कधी ढग फकत रात्रीचाच पवित्र निवास मंडपावर राही सकाळी तो हाले. तेव्हा इस्राएल लोक आपले सामान घेऊन त्याच्यामागे जात असत.
22 22 ढग जर पवित्र निवास मंडपावर दोन दिवस, किंवा महिनाभर किंवा वर्षभर राहिला तर लोक परमेश्वराची आज्ञा मानून तेथेच राहात असत आणि ढग हाले पर्यंत तेथून हालत नसत, मग ढग जेव्हा आपल्या जागेवरुन हाले तेव्हा लोकही तळ हलवीत.
23 23 तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा मानीत, परमेश्वर दाखवी तेथेच ते तळ देत आणि परमेश्वर जेव्हा हालण्यास आज्ञा देई तेव्हा लोक तळ हलवून ढगाच्या मागे जात. लोक लक्ष देऊन परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळीत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×