|
|
1. वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला. दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
|
1. And it came to pass H1961 , after the year H8141 was expired H8666 , at the time H6256 when kings H4428 go forth H3318 to battle , that David H1732 sent H7971 H853 Joab H3097 , and his servants H5650 with H5973 him , and all H3605 Israel H3478 ; and they destroyed H7843 H853 the children H1121 of Ammon H5983 , and besieged H6696 H5921 Rabbah H7237 . But David H1732 tarried H3427 still at Jerusalem H3389 .
|
2. संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
|
2. And it came to pass H1961 in an eveningtide H6256 H6153 , that David H1732 arose H6965 from off H4480 H5921 his bed H4904 , and walked H1980 upon H5921 the roof H1406 of the king H4428 's house H1004 : and from H4480 H5921 the roof H1406 he saw H7200 a woman H802 washing H7364 herself ; and the woman H802 was very H3966 beautiful H2896 to look H4758 upon.
|
3. तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”
|
3. And David H1732 sent H7971 and inquired H1875 after the woman H802 . And one said H559 , Is not H3808 this H2063 Bath H1339 -sheba , the daughter H1323 of Eliam H463 , the wife H802 of Uriah H223 the Hittite H2850 ?
|
4. तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.
|
4. And David H1732 sent H7971 messengers H4397 , and took H3947 her ; and she came H935 in unto H413 him , and he lay H7901 with her H5973 ; for she H1931 was purified H6942 from her uncleanness H4480 H2932 : and she returned H7725 unto H413 her house H1004 .
|
5. पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”
|
5. And the woman H802 conceived H2029 , and sent H7971 and told H5046 David H1732 , and said H559 , I H595 am with child H2030 .
|
6. दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले.
|
6. And David H1732 sent H7971 to H413 Joab H3097 , saying , Send H7971 H413 me H853 Uriah H223 the Hittite H2850 . And Joab H3097 sent H7971 H853 Uriah H223 to H413 David H1732 .
|
7. उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.
|
7. And when Uriah H223 was come H935 unto H413 him, David H1732 demanded H7592 of him how Joab H3097 did H7965 , and how the people H5971 did H7965 , and how the war H4421 prospered H7965 .
|
8. मग म्हणाला, “घरी जा आणि आराम कर.” उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली
|
8. And David H1732 said H559 to Uriah H223 , Go down H3381 to thy house H1004 , and wash H7364 thy feet H7272 . And Uriah H223 departed H3318 out of the king's house H4480 H1004 H4428 , and there followed H3318 H310 him a mess H4864 of meat from the king H4428 .
|
9. पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला.
|
9. But Uriah H223 slept H7901 at the door H6607 of the king H4428 's house H1004 with H854 all H3605 the servants H5650 of his lord H113 , and went H3381 not H3808 down to H413 his house H1004 .
|
10. उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले.तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”
|
10. And when they had told H5046 David H1732 , saying H559 , Uriah H223 went not down H3381 H3808 unto H413 his house H1004 , David H1732 said H559 unto H413 Uriah H223 , Camest H935 thou H859 not H3808 from thy journey H4480 H1870 ? why H4069 then didst thou not H3808 go down H3381 unto H413 thine house H1004 ?
|
11. उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”
|
11. And Uriah H223 said H559 unto H413 David H1732 , The ark H727 , and Israel H3478 , and Judah H3063 , abide H3427 in tents H5521 ; and my lord H113 Joab H3097 , and the servants H5650 of my lord H113 , are encamped H2583 in H5921 the open H6440 fields H7704 ; shall I H589 then go H935 into H413 mine house H1004 , to eat H398 and to drink H8354 , and to lie H7901 with H5973 my wife H802 ? as thou livest H2416 , and as thy soul H5315 liveth H2416 , I will not do H6213 H853 this H2088 thing H1697 .
|
12. दावीद उरीयाला म्हाणाला, “आजच्या दिवस इथे राहा. उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो.”उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला.
|
12. And David H1732 said H559 to H413 Uriah H223 , Tarry H3427 here H2088 today H3117 also H1571 , and tomorrow H4279 I will let thee depart H7971 . So Uriah H223 abode H3427 in Jerusalem H3389 that H1931 day H3117 , and the morrow H4480 H4283 .
|
13. दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
|
13. And when David H1732 had called H7121 him , he did eat H398 and drink H8354 before H6440 him ; and he made him drunk H7937 : and at even H6153 he went out H3318 to lie H7901 on his bed H4904 with H5973 the servants H5650 of his lord H113 , but went H3381 not H3808 down to H413 his house H1004 .
|
14. दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
|
14. And it came to pass H1961 in the morning H1242 , that David H1732 wrote H3789 a letter H5612 to H413 Joab H3097 , and sent H7971 it by the hand H3027 of Uriah H223 .
|
15. त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
|
15. And he wrote H3789 in the letter H5612 , saying H559 , Set H3051 ye H853 Uriah H223 in H413 the forefront H4136 H6440 of the hottest H2389 battle H4421 , and retire H7725 ye from H4480 H310 him , that he may be smitten H5221 , and die H4191 .
|
16. यवाबाने नगराची टेहेळणी करुन सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले.
|
16. And it came to pass H1961 , when Joab H3097 observed H8104 H413 the city H5892 , that he assigned H5414 H853 Uriah H223 unto H413 a place H4725 where H834 H8033 he knew H3045 that H3588 valiant H2428 men H376 were .
|
17. राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली. उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
|
17. And the men H376 of the city H5892 went out H3318 , and fought H3898 with H854 Joab H3097 : and there fell H5307 some of H4480 the people H5971 of the servants H4480 H5650 of David H1732 ; and Uriah H223 the Hittite H2850 died H4191 also H1571 .
|
18. नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले.
|
18. Then Joab H3097 sent H7971 and told H5046 David H1732 H853 all H3605 the things H1697 concerning the war H4421 ;
|
19. युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
|
19. And charged H6680 H853 the messenger H4397 , saying H559 , When thou hast made an end H3615 of telling H1696 the matters H1697 of the war H4421 unto H413 the king H4428 ,
|
20. यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, “यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.
|
20. And if H518 so be H1961 that the king H4428 's wrath H2534 arise H5927 , and he say H559 unto thee, Wherefore H4069 approached H5066 ye so nigh unto H413 the city H5892 when ye did fight H3898 ? knew H3045 ye not H3808 that H834 they would shoot H3384 from H4480 H5921 the wall H2346 ?
|
21. तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा मुलगा अबीमलेख याला एका बाईने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतकया जवळ का गेला?’ राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे, “उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.”’
|
21. Who H4310 smote H5221 H853 Abimelech H40 the son H1121 of Jerubbesheth H3380 ? did not H3808 a woman H802 cast H7993 a piece H6400 of a millstone H7393 upon H5921 him from H4480 H5921 the wall H2346 , that he died H4191 in Thebez H8405 ? why H4100 went ye nigh H5066 H413 the wall H2346 ? then say H559 thou , Thy servant H5650 Uriah H223 the Hittite H2850 is dead H4191 also H1571 .
|
22. निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले.
|
22. So the messenger H4397 went H1980 , and came H935 and showed H5046 David H1732 H853 all H3605 that H834 Joab H3097 had sent H7971 him for.
|
23. तो म्हणाला, “अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला. आम्ही त्यांचा सामना करुन त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.
|
23. And the messenger H4397 said H559 unto H413 David H1732 , Surely H3588 the men H376 prevailed H1396 against H5921 us , and came out H3318 unto H413 us into the field H7704 , and we were H1961 upon H5921 them even unto H5704 the entering H6607 of the gate H8179 .
|
24. मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला. त्यात काही जण ठार झाले. उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.”
|
24. And the shooters H3384 shot H3384 from off H4480 H5921 the wall H2346 upon H413 thy servants H5650 ; and some of the king's servants H4480 H5650 H4428 be dead H4191 , and thy servant H5650 Uriah H223 the Hittite H2850 is dead H4191 also H1571 .
|
25. दावीद त्या निरोप्याला म्हणाला, “यवाबाला सांग, “निराश होऊ नको, हिंमत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा. तुम्ही जिंकाल.’ यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.”
|
25. Then David H1732 said H559 unto H413 the messenger H4397 , Thus H3541 shalt thou say H559 unto H413 Joab H3097 , Let not H408 H853 this H2088 thing H1697 displease H3415 H5869 thee, for H3588 the sword H2719 devoureth H398 one H2088 as well as another H2090 : make thy battle H4421 more strong H2388 against H413 the city H5892 , and overthrow H2040 it : and encourage H2388 thou him.
|
26. उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
|
26. And when the wife H802 of Uriah H223 heard H8085 that H3588 Uriah H223 her husband H376 was dead H4191 , she mourned H5594 for H5921 her husband H1167 .
|
27. काही काळाने तिचे दु:ख ओसरल्यावर दावीदाने सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.
|
27. And when the mourning H60 was past H5674 , David H1732 sent H7971 and fetched H622 her to H413 his house H1004 , and she became H1961 his wife H802 , and bore H3205 him a son H1121 . But the thing H1697 that H834 David H1732 had done H6213 displeased H3415 H5869 the LORD H3068 .
|