Bible Versions
Bible Books

Hosea 4:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका! ह्या देशात राहणाव्या लोकांविरुध्द परमेश्वर आपले म्हणणे मांडणार आहे. “ह्या देशातील लोकांना परमेश्वराची खरीखुरी ओळख नाही. ते सत्याने वागत नाहीत आणि परमेश्वराशी एकनिष्ठ नाहीत.
2 2 लोक शपथ घेतात, खोटे बोलतात, ठार मारतात आणि चोरी करतात ते व्यभिचाराचे पाप करतात आणि त्यांना मुले होतात ते पून्हा पून्हा खून करतात.
3 3 म्हणून देश, मृतासाठी शोक करणाव्या माणसाप्रमाणे झाला आहे. देशातील सर्व लोक दुर्बल झाले आहेत. रानातील प्राणी, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासेसुध्दा मरत आहेत.
4 4 कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे.
5 5 तुम्ही (याजक) दिवसा-ढवव्व्या पडाल आणि रात्री, तुमच्याबरोबर संदेष्टे पडतील. मी तुमच्या आईचा नाश करीन.
6 6 “माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश झाला. तुम्ही शिकण्याचे नाकारले आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या सेवेत याजक होण्यास नकार देईन. तुम्ही तुमच्या देवाचा नियम विसरलात, म्हणून मी तुमच्या मुलांना विसरेन.
7 7 ते गर्विष्ठ झाले, त्यांनी माझ्याविरुद्ध खूप पाप केले. म्हणून मी त्यांचे वैभवाचे लाजिरवाण्या स्थितीत रूपांतर करीन.
8 8 “लोकांच्या पापांमध्ये याजक सहभागी झाले. त्यांना ती पापे आणखी पाहिजे आहेत.
9 9 म्हणजेच याजक लोकांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन. त्यांच्या चुकांची मी परतफेड करीन.
10 10 ते खातील, पण त्यांची तृप्ती होणार नाही. ते व्यभिचाराचे पाप करतील, पण त्यांना मुले होणार नाहीत. का? कारण त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आणि वेश्येप्रमाणे वर्तन केले.
11 11 व्यभिचार, कडक पेय, नवीन मद्य माणसाची सरळ विचार करण्याची ताकद नष्ट करतील.
12 12 माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला ते वेश्येप्रमाणे वागले.
13 13 पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात.
14 14 “मी तुमच्या मुलींनी वेश्या झाल्याबद्दल वा तुमच्या सुंनाना व्यभिचाराचे पाप केल्याबरोबर झोपतात. ते मंदिरातील कलावंतिणीबरोबर बळी अर्पण करतात. म्हणजेच ते मूर्ख लोक स्वत:चाच नाश करून घेत आहेत.
15 15 “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस.
16 16 “परमेश्वराने इस्राएलला खूप गोष्टी दिल्या आहेत. खूप गवत असलेल्या विस्तीर्ण कुरणात आपल्या मेंढ्यांना घेऊन जाणाव्या मेंढपाळाप्रमाणे परमेश्वर आहे. पण इस्राएल पुन्हा पुन्हा पळून जाणाव्या कालवडीप्रमाणे हट्टी आहे.
17 17 एफ्राईमने त्याच्या मूर्तोशी हातमिळवणी केली आहे. तेव्हा त्याला ऐकटा ठेवा.
18 18 “एफ्राईम त्यांच्या धुंदीत सामील झाला आहे. मद्यपान केल्यानंतर ते वेश्यांप्रमाणे वागत आहेत. ते आपल्या प्रियकरांकडून लाजिरवाण्या भेटी मागतात.
19 19 ते संरक्षणासाठी त्या दैवतांजवळ गेले आणि त्यांनी आपली विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांनी अर्पण केलेले बळी त्यांना नामुष्कीच आणतात.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×