|
|
1. {प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय} PS मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
|
1. Though G1437 I speak G2980 with the G3588 tongues G1100 of men G444 and G2532 of angels G32 , and G1161 have G2192 not G3361 charity G26 , I am become G1096 as sounding G2278 brass G5475 , or G2228 a tinkling G214 cymbal G2950 .
|
2. आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
|
2. And G2532 though G1437 I have G2192 the gift of prophecy G4394 , and G2532 understand G1492 all G3956 mysteries G3466 , and G2532 all G3956 knowledge G1108 ; and G2532 though G1437 I have G2192 all G3956 faith G4102 , so that G5620 I could remove G3179 mountains G3735 , and G1161 have G2192 not G3361 charity G26 , I am G1510 nothing G3762 .
|
3. आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
|
3. And G2532 though G1437 I bestow all my goods to feed G5595 G3956 G3450 G5224 the poor, and G2532 though G1437 I give G3860 my G3450 body G4983 to G2443 be burned G2545 , and G2532 have G2192 not G3361 charity G26 , it profiteth G5623 me nothing G3762 .
|
4. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
|
4. Charity G26 suffereth long G3114 , and is kind G5541 ; charity G26 envieth G2206 not G3756 ; charity G26 vaunteth not itself G4068 G3756 , is not G3756 puffed up G5448 ,
|
5. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.
|
5. Doth not G3756 behave itself unseemly G807 , seeketh G2212 not G3756 her own G1438 , is not G3756 easily provoked G3947 , thinketh G3049 no G3756 evil G2556 ;
|
6. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.
|
6. Rejoiceth G5463 not G3756 in G1909 iniquity G93 , but G1161 rejoiceth G4796 in the G3588 truth G225 ;
|
7. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
|
7. Beareth G4722 all things G3956 , believeth G4100 all things G3956 , hopeth G1679 all things G3956 , endureth G5278 all things G3956 .
|
8. प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;
|
8. Charity G26 never G3763 faileth G1601 : but G1161 whether G1535 there be prophecies G4394 , they shall fail G2673 ; whether G1535 there be tongues G1100 , they shall cease G3973 ; whether G1535 there be knowledge G1108 , it shall vanish away G2673 .
|
9. कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.
|
9. For G1063 we know G1097 in G1537 part G3313 , and G2532 we prophesy G4395 in G1537 part G3313 .
|
10. पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.
|
10. But G1161 when G3752 that which is perfect G5046 is come G2064 , then G5119 that G3588 which is in G1537 part G3313 shall be done away G2673 .
|
11. जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
|
11. When G3753 I was G2252 a child G3516 , I spake G2980 as G5613 a child G3516 , I understood G5426 as G5613 a child G3516 , I thought G3049 as G5613 a child G3516 : but G1161 when G3753 I became G1096 a man G435 , I put away G2673 childish things G3588 G3516 .
|
12. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,
|
12. For G1063 now G737 we see G991 through G1223 a glass G2072 , darkly G1722 G135 ; but G1161 then G5119 face G4383 to G4314 face G4383 : now G737 I know G1097 in G1537 part G3313 ; but G1161 then G5119 shall I know G1921 even as G2531 also G2532 I am known G1921 .
|
13. सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. PE
|
13. And G1161 now G3570 abideth G3306 faith G4102 , hope G1680 , charity G26 , these G5023 three G5140 ; but G1161 the greatest G3187 of these G5130 is charity G26 .
|